अहिल्यानगर,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत राहाता तालुका सोसायटी मतदारसंघातून डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल डॉ. सुजय दादा मित्र मंडळ, प्रवरा परिसराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राहाता तालुका सोसायटी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळावी तसेच शेतकरी, सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी बँकेच्या माध्यमातून प्रभावी काम व्हावे, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.या निवडीबद्दल डॉ. सुजय दादा मित्र मंडळ, प्रवरा परिसर यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.








