श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने दाढमध्ये सामाजिक योगदानाचा संदेश

झरेकाठी (प्रतिनिधी):- समाजाचे आपण काही देणे लागतो, या सेवाभावी भावनेतून तसेच दुष्काळी परिस्थितीत समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, या जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकराव गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मल्टीपर्पज मॅट भेट देण्यात आल्या. मागील वर्षी १५ आणि यावर्षी ११ अशा एकूण २६ मॅट विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. या मॅटचा उपयोग इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी होणार आहे.

तसेच भारतीय जनता पार्टी कोल्हार मंडल अध्यक्ष तथा श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशभाऊ तांबे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ३ हॉलीबॉल, २ फुटबॉल आणि २ हॉलीबॉल नेट यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच भाऊराव गाडेकर, प्रवरा कारखान्याचे संचालक गोरक्षनाथ पा. तांबे, श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशभाऊ तांबे पाटील, दाढ बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच तात्यासाहेब सातपुते, महात्मा फुले विद्यालयाच्या पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच गावातील रविआण्णा बनसोडे, शिवदास बनसोडे, निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष पांडू तात्या, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष नानासाहेब तांबे पाटील, सचिन वाणी, राज इनामदार, बाळासाहेब पाळंदे, भागवत पा. तांबे, संतोष वाणी, आरपीआयचे आकाशभाऊ पारधे, संदिप वाणी, रितेश कुमकर, संदिप पाळंदे, सनी पाळंदे, बंटी भोसले, करण पाळंदे, शंकर पा. तांबे, किरण गाडेकर, आकाश पाळंदे आदी उपस्थित होते

Leave a Comment

error: Content is protected !!