शिर्डी,(प्रतिनिधी):- श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा असून, भक्तिभावाने साईभक्तांकडून श्री साईचरणी विविध स्वरूपातील दान अर्पण केले जाते. याच भक्तिभावातून नागपूर येथील साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांनी श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा आकर्षक ‘ॐ’ अक्षराच्या आकारातील ब्रोच अर्पण केला.
या सोन्याच्या ब्रोचचे वजन ३२ ग्रॅम ८५० मिलीग्रॅम असून त्याची किंमत ४ लाख ५६ हजार ५७ रुपये इतकी आहे. साईभक्त वडनेरे यांनी श्रद्धापूर्वक हा ब्रोच श्री साईचरणी अर्पण.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानच्या वतीने त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक करण्यात आले.साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या सोन्याच्या ‘ॐ’ ब्रोचमुळे साईभक्तांमध्येही भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.








