नगरी समाचार(प्रतिनिधी):- मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांनी सहपरीवार शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शन घेऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी कचरे यांनी मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांचा सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्यासह संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांच्या शिर्डी भेटीच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.









