लोणी खुर्द येथील एकलव्य नगरातील महिलांना रेशन कार्डचे वाटप

शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना रेशन कार्डचे वितरण

लोणी,(प्रतिनिधी):- लोणी खुर्द येथील एकलव्य नगर परिसरातील महिलांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.

रेशन कार्ड उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील महिलांना शासकीय धान्य तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. रेशन कार्ड मिळाल्याने लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना शासकीय योजनांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला, नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

error: Content is protected !!