नगरी समाचार (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे विना पासिंग/नोंदणी क्रमांकाची दुचाकी चालवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांवर श्रीरामपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) पथकाने दंडात्मक कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित दुचाकीवर एकूण ₹४,५०० रुपयांचा दंड केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन शालेय विद्यार्थी दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या RTO अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून दुचाकीबाबत चौकशी केली. दुचाकीचे पासिंग झाले आहे का? अशी विचारणा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडे केली. त्यावर विद्यार्थ्यांनी, “शोरूमवाले उद्यापासून पासिंग करणार आहेत,” असे सांगितले.
यानंतर अधिकाऱ्यांनी, दुचाकीचे पासिंग झालेले नसताना शोरूमने वाहन ग्राहकाला दिले कसे, असा सवाल केला. या प्रकरणात RTO कडून दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपलब्ध पावतीनुसार या कारवाईमध्ये विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनांसाठी एकूण ₹४,५०० रुपयांची दंड केला.दरम्यान, संबंधित दुचाकी ज्या शोरूममधून देण्यात आली, त्या शोरूमवर RTO कारवाई होणार का? तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर RTO कारवाई कधी करणार? विना पासिंग दुचाकीवर RTO कडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर स्थानिक पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तुम्ही RTO कार्यालय श्रीरामपूर येथे या तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. तसेच बॅच दाखवून माझे नाव प्रवीण सर्जेराव आहे लिहून घ्या. असे उत्तर संबंधित अधिकाऱ्याने दिले.
श्रीरामपूर,राहाता, संगमनेर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर RTO कडून नियमित आणि ठोस कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विशेषतः क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे, परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
विना पासिंग दुचाकीवर झालेली कारवाई ही नियमांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाची असली, तरी सर्व प्रकारच्या नियमबाह्य वाहतुकीवर समान पद्धतीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









