नगरी समाचार (प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा भिडे, भूसंपादन अधिकारी श्रीमती सावंत, उपजिल्हाधिकारी श्री दळवी, जिल्हा सूचना विभागाचे पवन टेंभुर्णे, नगर विकास विभागाचे सह संचालक श्री पठारे, तहसीलदार मयूर बेरड, श्री गायकवाड, श्रीमती पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, निमंत्रित मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.









