कुरणपुरमध्ये महिलेचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी,(प्रतिनिधी):- कुरणपुर गावात रस्त्यात अडवून एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविराज उर्फ सोन्या रामदास विटनोर आणि योगेश रामदास विटनोर (दोघे रा. कुरणपुर, ता. श्रीरामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुरणपुर गावात घडली. फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना आरोपींनी तिला अडवून, “तू मला खूप आवडतेस, तुझा मोबाईल नंबर दे,” असे म्हणत तिचा हात धरून जवळ ओढले आणि मिठी मारली. यावेळी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी महिलेने २१ सप्टेंबर रोजी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, १२६(२), ३५१(२), ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/११७९ गणेश अडांगळे करीत आहेत.

error: Content is protected !!