लोणी बुद्रुक येथील ताराबाई भाऊराव विखे यांचे दुःखत निधन

लोणी,(प्रतिनिधी):- येथील कैलासवासी ताराबाई भाऊराव विखे यांचे रात्री ८.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्या लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य प्रवीण विखे यांच्या मातोश्री होत्या.

ताराबाई विखे यांच्या निधनाची वार्ता समजताच विखे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने विखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताराबाई विखे यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू असल्याने त्यांचा नातेवाईक व परिचितांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांनी शोक व्यक्त केला.त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा परिवार आहे.

error: Content is protected !!