सागर बेग यांचा अंतरिम जामीन उच्च न्यायालयाकडून कायम

श्रीरामपूर,(प्रतिनिधी):- सागर बेग यांचा अंतरिम जामीन छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. श्रीरामपूर येथील न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी सागर बेग यांचा अंतरिम जामीन रद्द केला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. सागर बेग यांच्या बाजूने अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद केला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत संकेत ठाणगे यांनी बाजू मांडली.

सुनावणीअंती उच्च न्यायालयाने सागर बेग यांचा अंतरिम जामीन कायम ठेवला. त्यामुळे श्रीरामपूर न्यायालयाच्या २२ सप्टेंबरच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर परिस्थितीला आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नवा वळण मिळाले आहे.

दरम्यान, अंतरिम जामीन कायम झाल्यानंतर सागर बेग पुन्हा राजकीय वर्तुळात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पुढील राजकीय हालचालींकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!