कोल्हार बुद्रुकमध्ये गणेश मंडळाची १५ हजारांची केबल चोरी

कोल्हार,(प्रतिनिधी):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार बुद्रुक येथे गणेश मंडळाच्या विद्युत रोषणाईसाठी जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची १०० फूट केबल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत विरेंद्र शामगीर गोसावी (वय २७, रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

की रात्री साडेअकराच्या सुमारास कोल्हार बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये ‘एकलव्य मित्र मंडळ, भगवती नगरचा राजा’ या गणेश मंडळाच्या लाईट डेकोरेशनसाठी त्यांनी २४ कोअरची काळ्या रंगाची १०० फूट केबल जोडली होती.

 सकाळी ६ वाजता विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी १० वाजता गणेश मंडळाच्या ठिकाणी विद्युत प्रवाह व साउंड सिस्टिम तपासण्यासाठी गेले असता, जोडलेली केबल जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही केबल मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने ती चोरली.

चोरीस गेलेल्या केबलची किंमत सुमारे १५ हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास हे.कॉ. वाल्मिक परधी करीत आहे.

error: Content is protected !!