डॉ. सुजय विखे पाटील यांचे मतदान; राहाता येथे बजावला हक्क

राहाता,(प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था मानली जाते. शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासात बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम व्हावी, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना भक्कम आर्थिक आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

error: Content is protected !!