लोणी बुद्रुकची दिंडी विठ्ठलनामाच्या भक्तिरसात दंग

लोणी बुद्रुकची दिंडी विठ्ठलनामाच्या भक्तिरसात दंग; ताहाराबादकडे वारकऱ्यांची पायी वारी

नगरी समाचार (प्रतिनिधी):- टाळ-मृदंगाचा निनाद, मुखी विठ्ठलाचे नाम आणि पंढरीच्या ओढीने पुढे पडणारी वारकऱ्यांची पावले अशा भक्तिमय वातावरणात लोणी बुद्रुक येथून संत महिपती महाराज देवस्थान, श्रीक्षेत्र ताहाराबादकडे जाणाऱ्या पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले. विठ्ठलनामाच्या गजरात शेकडो भाविक या दिंडीत सहभागी झाले होते.iआषाढी वारीनंतर गोपालकाल्याला धाकट्या एकादशीच्या दिवशी पांडुरंग श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे येऊन वारकऱ्यांना दर्शन देतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागांतून असंख्य दिंड्या धाकट्या एकादशीच्या निमित्ताने ताहाराबाद येथे दाखल होतात.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेली परंपरा आजही कायम लोणी बुद्रुक येथून ताहाराबादकडे जाणाऱ्या या पायी दिंडीची परंपरा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केली होती. ही परंपरा आजही अखंडपणे सुरू असून, यावर्षी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या वतीने दिंडीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.सकाळी लोणी बुद्रुक येथून दिंडी मार्गस्थ झाली. पाथरे, सोनगाव, डुक्रेवाडीमार्गे प्रवास करत दुपारच्या वेळी महाप्रसाद घेण्यात आला. त्यानंतर कानडगाव, वरशिंदे मार्गे दिंडी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे पोहोचली.

दिंडीच्या मार्गावर वरुणराजाने अधूनमधून पावसाच्या सरी बरसवत वारकऱ्यांचे स्वागत केले. हिरवाईने नटलेले डोंगर, घाटातून जाणारी वारकऱ्यांची दिंडी आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा गजर, यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.दिंडीच्या मार्गावर वरुणराजाने अधूनमधून पावसाच्या सरी बरसवत वारकऱ्यांचे स्वागत केले. हिरवाईने नटलेले डोंगर, घाटातून जाणारी वारकऱ्यांची दिंडी आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या.

कानडगाव येथे ओम गागरे यांच्या वस्तीवर वारकऱ्यांसाठी दुपारच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महिलांचा लक्षणीय सहभाग ह.भ.प. भारत महाराज धावणे व ह.भ.प. परसराम विखे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुक येथील युवकांनी दिंडीच्या आयोजनात पुढाकार घेतला. यंदाच्या दिंडीत महिलांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. महिला वारकऱ्यांनीही विठ्ठलनामाचा गजर करत उत्साहाने सहभाग नोंदविला.

दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी लोणी बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ आणि युवकांनी मोलाचे सहकार्य केले.वारकऱ्यांसाठी बससेवा; रथासाठी ट्रॅक्टरची व्यवस्थालोकनेते पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सुश्मिताताई विखे पाटील यांनी वारकऱ्यांच्या प्रवासासाठी बस उपलब्ध करून दिल्या. तसेच दिंडीच्या रथासाठी पोपट विखे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला.परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या दिंडी सोहळ्यामुळे लोणी बुद्रुक ते ताहाराबाद मार्गावर दिवसभर विठ्ठलनामाचा जयघोष घुमत होता.

Leave a Comment

error: Content is protected !!