नगरी समाचार (प्रतिनिधी):- जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी साम्राज्य ग्रुप, रहिमपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात आदिवासी संस्कृती, कला आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे.
या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी माजी संचालक (बँक ऑफ बडोदा) बापुसाहेब गुळवे पाटील, भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अकोले उपसभापती मारुती मेंगाळ, आरपीआयचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, संगमनेर तालुका भाजप अध्यक्ष गोकुळभाऊ दिघे, राहुल दिघे, शांताराम शिंदे, गणपत शिंदे, सरपंच सविता शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर गुळवे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणून चोपडा येथील सुप्रसिद्ध दीपक गलांगी बँड, गायक भैय्या मोरे सिंगर तसेच संदीप गायकवाड (आदिवासी भाऊ) यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक व सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी समाजाच्या समृद्ध कला, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मिरवणूक सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे पाटील, पप्पूशेठ गाढे पाटील तसेच आदिवासी साम्राज्य ग्रुप, रहिमपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.









