नगरी समाचार,(प्रतिनिधी):- शिर्डी श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपात भक्तिभावाने दान अर्पण केले जाते. याच भक्तीभावातून पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील साईभक्त श्रीमती वंदना खन्ना यांनी श्री साईबाबांच्या चरणी चांदीची तीन ताटे अर्पण केली.
या चांदीच्या तीन ताटांचे एकूण वजन ३ किलो १८ ग्रॅम असून, त्यांचे देणगी मूल्य ६ लाख ६९ हजार ९९६ रुपये इतकी आहे.
वंदना खन्ना यांनी ही चांदीची ताटे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.साईबाबांच्या चरणी विविध मौल्यवान वस्तू व दान अर्पण करण्याची भाविकांची परंपरा असून, या माध्यमातून भाविकांची साईबाबांवरील श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त होत आहे.









