चनेगाव बंधाऱ्यावरून झरेकाठी येथील ३५ वर्षीय व्यक्तीची उडी; शोधमोहीम सुरू

प्रतिनिधी,(सोमनाथ डोळे):- या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने वाणी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी आश्वी, राहुरी आणि लोणी पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यानंतर मंत्री विखे पाटील यांनी रेस्क्यू टीम, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासनाला तातडीने शोधमोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी आहेर यांनी शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच राहाता रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सतीश वाणी यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!