सादतपूर येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर

सादतपूरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कुत्रा-मांजराचा पाठलाग करताना कैद

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- सादतपूर परिसरातील मगर वस्ती भागात सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्या कुत्रा आणि मांजराचा पाठलाग करत असल्याचे या दृश्यांमध्ये दिसून येत आहे.

बिबट्याचा मानवी वस्तीजवळ दिवसाच्या वेळी वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मगर वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना तसेच शेतात काम करताना सतर्क राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला असून, पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!