गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ३५ जण १४ दिवसांसाठी हद्दपार

लोणी,(प्रतिनिधी):- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशोत्सव काळात वाद, भांडणे अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हद्दीतील ३५ जणांना १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी लोणी पोलीस स्टेशनकडून विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलेले तसेच यापूर्वी विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या व्यक्तींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्ती

१. सादिक लालु कुरेशी उर्फ शेख, रा. ममदापूर, ता. राहाता

२. शाहीद युनुस कुरेशी, वय ३०, रा. ममदापूर

३. साजिद युनुस कुरेशी, वय २६, रा. ममदापूर

४. अरबाज अल्ताफ कुरेशी, वय २४, रा. ममदापूर

५. जकेरिया शब्बीर कुरेशी, वय ३२, रा. ममदापूर

६. कैफ रऊफ कुरेशी, वय २४, रा. ममदापूर

७. वसीम हनीफ कुरेशी, वय २८, रा. ममदापूर

८. आरिफ अमीर कुरेशी, रा. ममदापूर

९. फईम नईम कुरेशी, वय ३५, रा. ममदापूर

१०. मतीन सलीम कुरेशी, रा. ममदापूर

११. इम्रान अब्दुलहक कुरेशी, वय २२, रा. ममदापूर

१२. सुफियान मेहबुब कुरेशी, वय ३०, रा. ममदापूर

१३. रुबान जावेद कुरेशी, वय २५, रा. ममदापूर

१४. अकिब रशिद उर्फ रज्जाक कुरेशी, रा. ममदापूर

१५. जावेद नाजु शेख, वय ३५, रा. ममदापूर

१६. हुजेब रज्जाक कुरेशी, वय २०, रा. ममदापूर

१७. शोएब यासीन कुरेशी, वय २६, रा. ममदापूर

१८. नाजीम बशीर पठाण, वय २८, रा. ममदापूर

१९. रेहान मोहंमद आयाज कुरेशी, वय २५, रा. ममदापूर

२०. अयान जब्बार कुरेशी, वय २५, रा. ममदापूर

२१. मुस्तकीन फकीरमोहंमद कुरेशी उर्फ शेख, रा. ममदापूर

२२. मोहसीन फकीरमोहमद कुरेशी उर्फ शेख, रा. ममदापूर

२३. मुद्दसर गुलाम कुरेशी, वय २५, रा. ममदापूर

२४. आतिक सलीम कुरेशी, रा. ममदापूर

२५. आदिल सादिक कुरेशी उर्फ शेख, रा. ममदापूर

२६. सद्दाम फकीर मोहम्मद कुरेशी/शेख, वय ३०, रा. ममदापूर

२७. अरबाज अब्दुलहक उर्फ कुरेशी, रा. ममदापूर

२८. रविंद्र उर्फ लहानू एकनाथ लोखंडे, रा. कोल्हार बुद्रुक

२९. प्रसन्ना विलास लोखंडे, रा. कोल्हार बुद्रुक

३०. दिपक राजेंद्र शिंदे, रा. चांडे वस्ती, ता. श्रीरामपूर

३१. संदेश उर्फ सनि सुधाकर काळे, रा. कोल्हार बुद्रुक

३२. दिनेश सुनिल होडगर, रा. चांडे वाडी, ता. श्रीरामपूर

३३. शेखर बाबुराव भालेराव, रा. कोल्हार बुद्रुक

३४. विलास उर्फ नधू दगडू बोरुडे, रा. कोल्हार बुद्रुक

३५. तुषार बाबासाहेब कणगरे, रा. कोल्हार बुद्रुक

लोणी पोलिसांकडून गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

गणेशोत्सव हा शांतता, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव असल्याने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ध्वनी प्रदूषण, वाहतूक नियम, मिरवणुकीचे नियोजन आणि सार्वजनिक सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करू नयेत. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणी पोलिसांनी केले आहे.गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोणी पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!