लोणी,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील श्री बिरोबा महाराज मंदिरात श्री बिरोबा महाराज काठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त काठी मिरवणूक, महाप्रसाद, अभिषेक, श्री सत्यनारायण पूजा आणि उडत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाच्या दिवशी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत कावडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ९ ते १० वाजेपर्यंत उडत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभिषेक व श्री सत्यनारायण पूजा होणार असून, दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या उत्सवासाठी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना शुभहस्ते उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजयदादा विखे पाटील, कल्पनाताई मैड, गणेश रंगनाथ विखे पाटील आणि युवराज आठरे साहेब यांचा समावेश आहे. तसेच लोणी बुद्रुक परिसरातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचीही उपस्थिती राहणार आहे.
श्री बिरोबा महाराज मित्र मंडळ, संस्थापक लक्ष्मण पाटीलबा विखे, ॲड.विवेक(बंटी) पाटील लगड,गणपत विश्वनाथ पाटील भोसले व अध्यक्ष मच्छिंद्र पवार तसेच कमिटी सदस्य आणि समस्त ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ विशेष सहकार्य करत आहेत.









