शिर्डी साईचरणी मध्यप्रदेशच्या भक्ताकडून सोन्याचे ब्रोच अर्पण

शिर्डी साईचरणी भक्ताची अनोखी श्रद्धा

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्री साईबाबांच्या चरणी देशभरातील साईभक्तांकडून श्रद्धेने विविध स्वरूपातील दान अर्पण केले जाते. याच भावनेतून मध्यप्रदेश येथील साईभक्त इंद्रजीत घोष यांनी श्री साईबाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रोच अर्पण केले.

या सोन्याच्या ब्रोचचे वजन १६ ग्रॅम २०० मिलीग्रॅम असून, त्याची देणगी किंमत १ लाख ८७ हजार १२६ रुपये असल्याचे सांगण्यात आले. साईभक्त इंद्रजीत घोष यांनी श्रद्धेने हे दान श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केले.

यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्त इंद्रजीत घोष यांचा सत्कार केला. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांच्या श्रद्धा व योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

श्री साईबाबांच्या चरणी देशभरातून येणाऱ्या भक्तांकडून सोन्या-चांदीच्या वस्तूंसह विविध स्वरूपातील मौल्यवान वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या जातात. या माध्यमातून साईभक्तांची बाबांप्रती असलेली श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त होत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!