साईचरणी पुण्यातील साईभक्ताकडून १२.८२ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण

नगरी समाचार,(प्रतिनिधी):- श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच श्रद्धेतून पुणे येथील साईभक्त श्री. विकास ताराचंद चोपकर यांनी गुरुवारी, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी श्री साईबाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.

या सुवर्ण मुकुटाचे वजन ९० ग्रॅम ९७० मिलीग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य सुमारे १२ लाख ८२ हजार ४९५ रुपये आहे. आकर्षक नक्षीकाम असलेला हा सुवर्ण मुकुट साईभक्तांच्या श्रद्धा आणि भक्तीचे अनमोल प्रतीक ठरला आहे.

साईभक्त श्री. विकास ताराचंद चोपकर यांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या सुवर्ण मुकुटाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

श्री साईबाबांच्या चरणी विविध मौल्यवान वस्तू, सोने-चांदी तसेच इतर स्वरूपात दान अर्पण करण्याची परंपरा भाविकांमध्ये कायम आहे. चोपकर यांनी अर्पण केलेला हा सुवर्ण मुकुटही साईभक्ती आणि श्रद्धेचे विशेष उदाहरण ठरले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!