शिर्डी साईभक्ताकडून साईचरणी सात सोन्याचे नाणे अर्पण

नगरी समाचार (प्रतिनिधी):- श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात. याच श्रद्धेतून एका साईभक्ताने आज श्री साईचरणी तब्बल २१ लाख ०९ हजार ६९१ रुपये किमतीची ७ सोन्याची नाणी अर्पण केली.अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या नाण्यांचे एकूण वजन १३६ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम आहे. साईभक्ताने भक्तिभावाने ही देणगी श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केली.

देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. संस्थानच्या वतीने साईभक्ताने अर्पण केलेल्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. श्री साईबाबांच्या चरणी भक्तांकडून सातत्याने विविध स्वरूपात देणग्या अर्पण केल्या जात असून, साईभक्तांची बाबांवरील श्रद्धा आणि सेवाभाव यातून अधोरेखित होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!