नगरी समाचार,(प्रतिनिधी):- शिर्डी : श्री साईबाबांच्या चरणी देशभरातील साईभक्तांकडून श्रद्धेने विविध स्वरूपात दान अर्पण केले जाते. श्री कृष्ण जयंती (गोकुळाष्टमी) निमित्त दिल्ली येथील साईभक्त योगेश शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी ३ लाख २७ हजार २१६ रुपये किंमतीचे २२ ग्रॅम ९४० मिलीग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रोच श्रद्धापूर्वक अर्पण केले.

साईभक्त योगेश शर्मा यांनी श्री साईबाबांप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त करत हे सोन्याचे ब्रोच संस्थानकडे देणगी स्वरूपात सुपूर्द केले. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
श्री साईबाबांच्या चरणी देशभरातून येणारे भाविक विविध स्वरूपात दान अर्पण करीत असतात. भक्तांच्या या श्रद्धा आणि सेवाभावामुळे श्री साईबाबा संस्थानच्या धार्मिक व सामाजिक कार्याला सातत्याने हातभार लागत आहे.









