नगरी समाचार,(प्रतिनिधी):- राहाता तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ क्वार्टरच्या आवारात पाच वर्षीय मुलीसोबत अयोग्य कृत्य केल्याच्या आरोपावरून एका डॉक्टरविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७ ते ७.१५ वाजेच्या दरम्यान राहता तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ क्वार्टरच्या आवारात घडली. पाच वर्षीय मुलगी आवारात खेळत असताना संबंधित डॉक्टरने तिच्यासोबत अयोग्य प्रकार केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली.
आईच्या तक्रारीवरून लोणी पोलिस ठाण्यात BNS कलम ६४(१), ६४(२), ६५(२), ७५(२), ७६ ॲट्रॉसिटी तसेच पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास डी.वाय.एस.पी.अमोल भारती करत आहेत.









