लोणी खुर्दमध्ये वैजापूरच्या तरुणाने स्वतःचे हात कापले

लोणी खुर्द येथील राजमाता जिजाऊ चौकात घडलेल्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी.

लोणी,(प्रतिनिधी):- राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील राजमाता जिजाऊ चौकात वैजापूर तालुक्यातील किरण साळवे या तरुणाने स्वतःचे हात कापल्याची  घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत किरण साळवे हा चौकात पडलेला आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ लोणी पोलिसांना माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर, रवींद्र मेढे, पोलीस कॉन्स्टेबल बाचकर मॅडम तसेच होमगार्ड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर रवी आहेर व पोलिसांच्या मदतीने जखमी किरण साळवे याला पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार किरण साळवे याने स्वतःच स्वतःवर वार केल्याची पोलिसांना शंका आहे. त्याने आपल्या मेहुण्यांचे नाव घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमागील नेमके कारण काय आहे, तसेच त्यांनी हे कृत्य का केले. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

किरण साळवे याने स्वतःवर वार का केले आणि त्याने मेहुण्यांचे नाव का घेतले, याचा तपास लोणी पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके सत्य आणि कारण स्पष्ट होणार आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!